1994 बॅचचे IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदाची नियुक्ती झाली आहे. सरकारने नव्यानेच हे पद काढले असून, देवेन भारती या पदावर बसणारे पहिले अधिकारी आहेत. दरम्यान, भारती यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर एक ट्विट केले, त्यांचे हेच ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट सिंघम सर्वांनाच माहित आहे. त्यात अजय देवगणने सिंघम नावाच्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला होता की, सामान्य लोक आणि प्रेक्षक चांगले काम करणाऱ्या सर्व पोलिसांना सिंघम म्हणून संबोधू लागले. माध्यमांमध्येही चांगले किंवा धाडसी काम करणाऱ्या पोलिसांना सिंघम म्हटले जाते.मात्र मुंबई पोलिसांचे पहिले विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट केले की, मुंबई पोलीस ही एक टीम आहे, इथे कोणताही सिंघम नाही. म्हणजे स्पेशल सीपींनी स्पष्ट केले की, प्रत्यक्षात मुंबई पोलिसांची ओळख सिंघम या नावाने नव्हे तर टीम आणि कामावरून होते. भारती यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे
#MumbaiPolice #DevenBharti #Singham #Maharashtra #IPS #Mumbai #PoliceCommissioner #HWNews